Tuesday, January 12, 2010


गो. नी. दाण्डेकरांच्या जैत रे जैत कादंबरीचे अभिवाचन

कादंबरीकार गो. नी. दाण्डेकरांच्या साहित्यातील एक महत्वाचं दालन म्हणजे महाराष्ट्रातल्या दुर्गांना पार्श्वभूमीवर ठेऊन त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या. ते स्वत: जतीवंत भटके. दुर्ग हा त्यांचा आत्यंतिक प्रेमाचा विषय. त्यांनी दुर्गांवर अनेकदा वास्तव्य केलं. तिथल्या रहिवाशांशी त्यांचं मैत्र झालं. त्यांच्या सुखद:खांना गोनीदांच्या कादंबऱ्यांत स्थान मिळालं. काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती कादंबरीतल्या व्यक्तिरेखा झाल्या. त्यातल्या काही आजही किल्यावर गेलं कि भेटतात. कादंबऱ्यांमधून आपण जवळपास सगळा दुर्ग अनुभवतो. तिथल्या राहाळात मनानं वावरतो. ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रे जैत’, ’रानभुली’, ’वाघरु’, ’त्या तिथे रुखातळी’ आणि माचीवरला बुधा’ या त्या सहा कादंबऱ्या. तुंग, कर्नाळा, रायगड, राजगड, भिवगड (कल्पित किल्ला) आणि राजमाची अशा सहा दुर्गांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.
जैत रे जैत’ ही कादंबरी आणि त्यावर आधारलेल्या चित्रपटातील कथानक कर्नाळा किल्याच्या परिसरात घडते. गोनीदांच्या शब्दाशब्दातून जिवंत होणारा हा अनुभव आपल्याला घेता येणार आहे थेट त्याच राहाळात, कर्नाळा किल्याच्या पायथ्याशी. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाने तेथे आयोजित केले आहे जैत रे जैत कादंबरीचे आभिवाचन. गोनीदांचे आप्त वीणा देव, विजय देव आणि रुचिर कुलकर्णी जैत रे जैत कादंबरीचे आभिवाचन करणार आहेत तिथे. ज्या आदिवासी नृत्यांची, ढोल वादनाची अप्रतिम वर्णने दाण्डेकरांनी केली आहेत तशाच आदिवासी नृत्यांचा रोमांचक अनुभवही आपल्याला त्यावेळी घेता येईल.
जैत रे जैत च्या आभिवाचनाचा आणि आदिवासी नृत्यांचा हा कार्यक्रम होणार आहे येत्या माघी पॊर्णिमेच्या टिपुर चांदण्यात, शनिवार दि. ३० जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ०६.३० पासून. कर्नाळा अभयारण्याजवळ कल्हे गावाच्या हद्दीत, मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्व बाजूला, निसर्गरम्य परिसरात हा अभिनव कार्यक्रम अयोजित केला आहे.
या कार्यक्रमानंतर, त्याच ठिकाणी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था आणि पनवेलपर्यंत परतीसाठी वाहन व्यवस्था कार्यक्रमाला उपस्थित राहाणाऱ्या रसिकांसाठी करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे आयोजन दुर्गमित्र, मारुती ऍडव्हेंचर ऍंड स्पोर्टस असोसिएशन, यंग झिंगारो ट्रेकर्स व जिद्द या संस्थांच्या सहकार्याने केले आहे.
या कार्यक्रमात प्रवेश सशुल्क आहे. कार्यक्रमासाठी प्रवेशिका खालील ठिकाणी मिळतील -
१. लागू बंधु मोतीवाले ( दादर, ठाणे व पुणे येथील दुकाने)
२. आयडियल बुक डेपो, दादर.
अधिक माहितीसाठी ९२२२१५०९७५ या भ्रमणध्वनीवर कृपया संपर्क साधावा.
मुकुंद गोंधळेकर
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाकरिता

Friday, January 8, 2010

गोनीदांच्या दुर्गविषयक कादंबऱ्यांचा आस्वाद घेणारा परिसंवाद

गो. नी. दाण्डेकरांच्या साहित्यातलं एक महत्वाचं दालन म्हणजे महाराष्ट्रातल्या दुर्गांना पार्श्वभूमीवर ठेऊन त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या. ते स्वत: जातीवंत भटके. दुर्ग हा त्यांचा आत्यंतिक प्रेमाचा विषय. त्यांनी दुर्गांवर अनेकदा वास्तव्य केलं. तिथल्या रहिवाशांशी त्यांचं मैत्र झालं. त्यांच्या सुखदु:खांना गोनीदांच्या कादंबऱ्यांत स्थान मिळालं. काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती कादंबरीतल्या व्यक्तिरेखा झाल्या. त्यातल्या काही आजही किल्यावर गेलं कि भेटतात. कादंबऱ्यांमधून आपण जवळपास सगळा दुर्ग अनुभवतो. तिथल्या राहाळात मनानं वावरतो. ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रे जैत’, ’रानभुली’, ’वाघरु’, ’त्या तिथे रुखातळी’, आणि ’माचीवरला बुधा, या त्या सहा कादंबऱ्या. तुंग, कर्नाळा, रायगड, राजगड, भिवगड (कल्पित किल्ला) आणि राजमाची अशा सहा दुर्गांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.
गोनीदांच्या या सहा दुर्गविषयक कादंबऱ्यांचा आस्वाद घेणारा परिसंवाद ’गोनीदा’ दुर्गप्रेमी मंडळाने आयोजित केला आहे. मंबईत दादर (पश्चिम) येथील वनमाळी सभागृहात मंगळवार दि. १९ जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ०६.३० होणाऱ्या या परिसंवादात श्री. निनाद बेडेकर, डॉ. वीणा देव, ऍडव्होकेट आनंद देशपांडे व श्री. अभिजीत बेल्हेकर सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात प्रवेश सर्वांना खुला आहे. सभागृहात आसनव्यवस्था मर्यादित असल्यामुळे या परिसंवादाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या श्रोत्यांनी आपले नाव एस.एम.एस. द्वारे ९२२२१ ५०९७५ या भ्रमणध्वनीवर नोंदवावे. या कार्यक्रमासंबंधी अधिक माहिती याच भ्रमणध्वनीवर मिळेल.
या परिसंवादाचे आयोजन ’दुर्गमित्र’, ’मारुती ऍडव्हेंचर ऍंड स्पोर्टस असोसिएशन’, यंग झिंगारो ट्रेकर्स, व ’जिद्द’ या संस्थांच्या सहकार्याने केले आहे.
मुकुंद गोंधळेकर
’गोनीदा’ दुर्गप्रेमी मंडळाकरिता