Thursday, May 27, 2010

गोनीदांचा स्मृति दिन

गोपाल नीलकंठ दाण्डेकर (गोनीदा ऊर्फ अप्पा) एक निखळ दुर्गप्रेमी व जातीवंत भटके. त्यांनी अनेकांना दुर्गभ्रमंतीचे वेड लावले. गोनीदानी दुर्गविषयक लेखन विपुल केले. अप्पांच्या सांगाती केलेल्या दुर्गभ्रमंतीच्या स्मृती म्हणजे अनेक दुर्गप्रेमींच्या मर्मबंधातील ठेव.
१ जून १९९८ रोजी इहलोकीच्या सर्व दुर्गप्रेमीना मागे सोडून अप्पा स्वर्गगडावर गेले. कधीही त्या गडावरून खाली न उतरण्याचा संकल्प करून, कायमच्या वास्तव्यासाठी.
गोनीदांच्या स्मृतिदिनानिमित्त इतिहासप्रेमी मंडळ, पुणे यांनी खालील कार्यक्रम आयोजित केला आहे :-

ऍडव्होकेट आनंद देशपांडे यांचे भाषण :
विषय - गोनीदांची दुर्गाभ्रमंती

श्री. निनाद बेडेकर यांचा स्लाइडस शो :
विषय - दुर्ग बांधणीची विविध रुपे

कार्यक्रमाचे स्थळ - भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे
वेळ - सायंकाळी ०६.०० वाजता, मंगळवार, दि. ०१ जून २०१०
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

No comments:

Post a Comment